देशात ओम्रीकॉन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. हे रुग्ण कर्नाटकमध्ये सापडल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
ते म्हणाले की, दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती घेण्यात आली आहे या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे.
अग्रवाल म्हणाले की, ओम्रीकॉनचे रुग्ण आढळले असले तरी घाबरण्याचे कारण नाही. मात्र खंबीर घेण्याची गरज आहे. कोविडबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि गर्दी टाळावी.
आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की ओम्रीकॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. तेव्हापासून त्याचा प्रसार २९ देशात झाला आहे. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवे निर्बंध लागू केले आहेत. ओम्रीकॉन रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आली आहे.