पुणे : राज्याचे नवे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पदभार स्वीकारताच जेके ग्रुप तसेच ‘चीनीमंडी’तर्फे त्यांचे निलेश पिंजरकर, सुदेष्णा माने, योगेश मुसळे यांनी स्वागत केले आणि त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ‘चीनीमंडी’च्या कामकाजाची माहिती जाणून घेतली आणि साखर उद्योगासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले.
डॉ. चंद्रकांत लक्ष्मणराव पुलकुंडवार हे 2008 च्या बॅचचे आयएएस आहेत. डॉ. पुलकुंडवार यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी, पुनर्विकास अधिकारी म्हणून, मेळघाट येथे उपविभागीय अधिकारी, कृष्णा खोरे प्रकल्पात विशेष भूसंपादन अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी (नांदेड), उपविभागीय अधिकारी (परभणी), एमआयडीसीचे उपमहाव्यवस्थापक (अंधेरी) म्हणून अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे. 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.