इस्लामाबाद : पाकिस्तानमधील राजकीय अस्थितरतेसह भीषण आर्थिक संकटात आहे. कंगालीच्या टोकावर पोहोचलेल्या पाकिस्तानमधील स्थिती इतकी खराब झाली आहे की, आटा चोरी रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या महागाई ४८ वर्षांतील उच्चांकी स्तरावर आहे. परकीय चलनसाठा तीन अब्ज डॉलरच्या खाली, २.९७ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानकडे परदेशातून साहित्य खरेदीसाठीही पैसे शिल्लक नाहीत. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने परकीय चलन साठ्यातील महागाई वाढणे, देशांतर्गत आर्थिक वातावरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत इशारा दिला आहे. महागाई ३४ वरून ३६ टक्क्यांवर पोहोचली असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या आटा मिळत नसल्याची स्थिती आहे. आटा तस्करी सुरू झाली असून बलुचिस्तानमध्ये आटा चोरी रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. सरकारने बेकायदा आदेश जारी करून माहिती दिली आहे.
बलुचिस्तान हे सर्वाधिक गहू उत्पादक राज्य आहे. पाकिस्तानमधील आटा तुटवड्यामुळे बलुचिस्तानच्या सरकारने आटा तस्करी रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.