परभणीत दीड एकरातील ऊस पिक जळून खाक

परभणी : सवना शिवारात नॅचरल शुगर साखर कारखान्यालगत शेतकरी विजय गोरे यांच्या शेताला लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी विजय गोरे यांनी आपल्या सर्व्हे क्रमांक २०२-३ मध्ये पाच एकरात ऊस लागवड केली आहे. आगीत दीड एकरातील पिकाचे नुकसान झाले. उसाला अचानक लागलेली आग वाऱ्याच्या वेगाने पसरली. शेजारचे शेतकरी राजू गोरे यांनी इतरांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. शेतकऱ्यांनी गावातील तरुणांना फोनद्वारे माहिती देवून मदत मागवली. गावातील ५० ते ६० तरुणांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. गोरे यांचा साडेतीन एकरातील ऊस आगीच्या तावडीतून बचावला. या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here