सोलापूर : कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप व साखर उत्पादनातील आघाडीबरोबरच कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून यंदाच्या गळीत हंगामात एक कोटी ४८ लाख ३५ हजार ४६८ युनिट विजेचे उत्पादन केल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी सांगितले. या विजेपैकी एक कोटी ५४ हजार ८०० युनिट विजेची निर्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला करण्यात आली आहे.
२०२१-२२ या हंगामातील प्रतिटन ९० रुपयांप्रमाणे ऊस बिलाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्या हंगामात उसाचा पुरवठा केलेल्या सभासद व बिगर सभासदांनी त्यांचा धनादेश कारखान्याच्या कार्यालयातून घेऊन जाण्याचे आवाहनही काडादी यांनी केले आहे. कारखान्याच्या चालू २०२३-२४ या गळीत हंगामात एक लाख ४५ हजार २१७ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. यातून एक लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार झाल्याचेही संचालक काडादी यांनी सांगितले.
काडादी म्हणाले कि, कारखाना यंदाच्या गाळप हंगामात पहिला हप्ता २७०० रुपये व डिसेंबरअखेर येणाऱ्या उसाला २९०० रुपये अंतिम दर देणार आहे. जानेवारीच्या पुढे प्रत्येक महिन्यास प्रति टन शंभर रुपये जास्त दर देणार आहोत. त्यामुळे सभासदांनी ऊस गाळपास घालण्यासाठी घाई न करता ऊस सिध्देश्विर सहकारी साखर कारखान्यास गाळपास देऊन हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन कारखान्याचे धर्मराज काडादी यांनी केले.