शामली : कॅबिनेट मंत्री सुरेश राणा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालात आयोजित बैठकीत आगामी गळीत हंगामापूर्वी शंभर टक्के शेतकऱ्यांना उसाचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील असे निर्देश देण्यात आले. मंत्री राणा यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. यापूर्वीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी किती झाली आहे त्याची पडताळणी करण्यात आली. योजनेबरहुकूम काम करावे असे निर्देश त्यांनी संबंधित संस्थांना दिले.
ऊस विभागाचा आढावा घेताना मंत्री राणा यांनी शेतकऱ्यांना गळीत हंगामापूर्वी शंभर टक्के ऊस बिले अदा केली जातील याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. यावेळी एनएचएआयकडून सुरू असलेल्या योजना आणि नव्या योजनांची माहिती घेऊन त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या. जी कामे सरू आहेत, ती योग्यरित्या पूर्ण करावीत अशी सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली. योजनांमधील कामे योग्य मानके, गुणवत्तेनुसार व्हावीत याची खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले.
जेवढ्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे, त्यांची साफसफाई, दुरुस्ती वेळेवर केली जावी याबाबत अधिकाऱ्यांना लक्ष देण्यास सांगण्यात आले. जिल्हाधिकारी जसजित कौर, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद कुमार सिंह, जिल्हा विकास अधिकारी प्रमोद कुमार, मुख्य आरोग्याधिकारी डॉ. संजय अग्रवाल, सर्व उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link