सहारनपुर: उत्तर प्रदेश च्या सहारनपुर जिल्हयातील सहा साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगामामध्ये जवळपास 100 लाख क्विंटल ऊस गाळप करुन नऊ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन मणि त्रिपाठी यांनी रविवारी सांगितले की, देवबंद चा त्रिवेणी साखर कारखाना सहारनपुर मंडलाचा एकमेव असा कारखाना आहे, ज्याने गेल्या हंगामातील सर्व थकबाकी भागवून चालू हंगामामध्ये पुरवण्यात आलेल्या ऊसाचे 10 करोड 28 लाख रुपये ही भागवले आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत ऊसाचे सरकारी खरेदी मूल्य घोषित केलेल नाही. म्हणून ऊस पावत्यांवर साखर कारखाने कोणतेही मूल्य नोंदवत नाही.