कृषी मालाच्या डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगवर आणखी एक वर्ष बंदी

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) भात (बिगर-बासमती), गहू, हरभरा, मोहरी, सोयाबीन आणि त्याची उत्पादने, कच्चे पाम तेल, मूग यांच्या डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगवर आणखी एक वर्षासाठी बंदी घातली आहे. महागाईचा दर उच्च स्तरावर असल्याने मंगळवारी रात्री २० डिसेंबर २०२३ पर्यंत निर्बंध जारी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी नियामकांनी सात वस्तूंचे सौदे नव्याने सुरू करण्यावर निर्बंध लागू केले होते. सौद्यांमध्ये कोणत्याही नव्या पोझिशनला संधी देण्यास नकार देताना सौदे पूर्ण करण्यास परवानगी दिली होती.

बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार,उपलब्ध आकडेवारीनुसार, या ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये घटून ११ महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर आला आहे. मात्र, आताही रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा तो थोडा कमी आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी निर्बंध घालण्यापूर्वी एनसीडीईएक्समध्ये एकूण डिपॉझिटमध्ये एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ या कालावधीत या वस्तूंची हिस्सेदारी ५४ टक्के होती. व्यवहारांवर बंदी घालण्यात आल्याने एनसीडीएक्सच्या तिमाही सरासरी व्यवहार आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २३१० कोटी रुपयांवरून घटून आर्थिक वर्ष २३ मध्ये ९६० कोटी रुपयांवर आला आहे. यामध्ये ५८ टक्क्यांची घसरण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here