पुणे : रब्बी हंगामात महाराष्ट्रातील कांदा लागवड सुमारे गतवर्षीच्या तुलनेत १ लाख १७ हजार हेक्टरने कमी झाले आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा सुमारे ९ लाख ४६ हजार टन उत्पादनात घटण्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. कृषी आयुक्तालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याची कमी उपलब्धता असल्याने मुख्य हंगाम असलेल्या रब्बीमध्ये क्षेत्र घटल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
चालू रब्बी हंगामात कांदा पिकाखालील क्षेत्र ४.३६ लाख हेक्टर (गतवर्षापेक्षा १.१७ लाख हेक्टर घट) आणि उत्पादन ८३.६२ लाख टनाइतके (गतवर्षापेक्षा ९.४६ लाख टनाने घट अपेक्षित) हाती येण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर वार्षिक कांदा लागवडीखालील क्षेत्रही ६.६३ लाख हेक्टरपर्यंत खाली आले असून, ११७.२८ लाख टन एकूण कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. जो गतवर्षीपेक्षा सुमारे तीन लाख टनांनी घटत असल्याची माहिती फलोत्पादन संचालनालयातील सूत्रांनी दिली.