कोल्हापूर : फराळे (ता. राधानगरी) येथील ओंकार शुगर ॲन्ड डिस्टीलरी पॉवर युनिट नंबर तीनतर्फे गळीत हंगाम २०२३-२४ मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनेज साखर वाटप सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना प्रती टन एक किलो साखर १० रुपये सवलतीच्या दरात दिली जाणार आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली. येत्या गळीत हंगामात एफआरपीपेक्षा जास्त ऊस दर देण्यास कारखाना कटिबद्ध असून, सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
ओंकार शुगरतर्फे २६ ऑक्टोबरपासून टनेज साखर वाटप सुरू केले आहे. ही साखर १५ नोव्हेंबरपर्यंत मिळणार आहे, अशी माहिती अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली. यावेळी शेतकरी व वाहनधारक ओमराजे मगदूम, बाबूराव गुरव, शिवाजी गाडीवड्डु, के. डी. मोहिते, अरविंद जाधव, चंद्रकांत कदम, शंकरराव पाटील, सोनबा सावंत, विकास पाटील, पांडुरंग पाटील, मारुती चौगले, डी. के. गुरव, अर्जुन पाटील, विलास पाटील व नारायण व्हरकट, सरव्यवस्थापक शत्रुघ्न पाटील, मुख्य शेती अधिकारी समीर व्हरकट, मुख्य लेखाधिकारी शरद पाटील, मुख्य अभियंता ए. बी. बनकर, केनयार्ड सुपरवायझर राहुल यादव, स्टोअर किपर रोहित जाधव आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.