जिल्ह्यात ऊसाचे ऑनलाईन सर्वेक्षण सुरु

अमरोहा : ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यामध्ये ऊसाचे ऑ्रनलाईन सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या आधारावर साखर कारखान्यांना ऊस वाटप करण्यात येणार आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. 24 मे पर्यंत सर्व कारखाने बंद होण्याची शक्यता आहे.

पुढच्या गाळप हंगामासाठी ऊस विभाग आणि साखर कारखान्यांनी सुरु केलेल्या या सर्वेक्षणात पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, जे शेतकर्‍यांच्या शेतावर जावून हा सर्वे करत आहेत. शेतकर्‍यांनी किती क्षेत्रफळावर ऊस लावला आहे, किती प्रकारचा ऊस पिकवत आहेत. या सर्वेच्या आधारावरच साखर कारखान्यांना ऊस क्षेंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. डीसीओ हेमेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, शेतकर्‍यांनी संबंधित ऊस पर्यवेंक्षकांशी संपर्क करुन आपल्या शेतावरील ऊसाचे सर्वेक्षण करुन घ्यावे. या सर्वेमध्ये पूर्ण पारदर्शकता राहील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here