हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
मराठवाड्याच्या कोरड्या भागातील धरणाची पाण्याची पातळी वेगाने खाली येत आहे आणि आता त्यामध्ये केवळ 0.7% बाकी आहे. या दुष्काळाच्या स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रातील धरणातील जलसाठा केवळ 7.7% आहे, जे या दशकातील सर्वात कमी आहे. गेल्या वर्षी या तारखेला राज्य धरणांमध्ये जल पातळी 18% तर मराठवाड्यात 14% होती. राज्यात 32 धरणांपैकी बहुतेक धरणांमध्ये धोक्याची पातळी बाकी आहे. राज्यात दुष्काळी भागाचा 42% वाटा आहे आणि गेल्या पाच वर्षात ही तिसरी आपत्ती आहे. याचा परिणाम राज्यातील 60% शेतकऱ्यांवरती झाला आहे. गेल्या वर्षी राज्यात फक्त 76% सामान्य पाऊस झाला होता, आणि मराठवाडा क्षेत्रात पाणी संकटामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे, उत्तर महाराष्ट्रातील धरणाच्या पाण्याची पातळी 6.4% आहे, पश्चिम महाराष्ट्रात 7.8%, विदर्भ नागपूर विभाग 6.2% आणि अमरावती विभागातील 7% आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार राज्यात मान्सून सुरू होईपर्यंत पुरेसे पाणी आणि चारा आहे. राज्यात लवकरच मान्सून येण्याची शक्यता आहे. हवामान अंदाज असे सांगतो की येणारा मान्सून सामान्य असेल. मा. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी असा दावा केला आहे कीं दुष्काळाशी लढण्यासाठी जूनच्या अखेरपर्यंत सरकारने पाणी आणि इतर गोष्टींची तरतूद केली आहे.
दुष्काळी भागांमध्ये सरकारने 10.6 लाख जनावरांसाठी 1,583 चारा छावण्यांना परवानगी दिली आहे. राज्यात एकूण 6,443 पाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी 3,359 मराठवाड्याला पाणी देत आहेत आणि मराठवाडाच्या औरंगाबाद जिल्ह्यात 1,146 टँकर ची व्यवस्था केली आहे.काही लोकांच्या म्हणण्यांनुसार मराठावाडासारख्या ऐतिहासिकदृष्ट्या दुष्काळी क्षेत्रात ऊस शेतीवर बंदी घालण्याची गरज आहे.तसेच हे क्षेत्र हा ऊस लागवडीसाठी पूर्णपणे चुकीचे आहे, परंतु राज्याने त्यावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. अतितीव्रतेचा, दुष्काळ असूनही बाटलीबंद पाणी व्यवसाय तेजीत आहे.