साखर कारखान्यांच्या मनमानीविरोधात तक्रार करण्याची शेतकऱ्यांना संधी

पाटणा : राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आता साखर कारखान्यांच्या मनमानी विरोधात तक्रार करू शकतील. या तक्रारी दूर करण्यासाठी ऊस उद्योग विभागाने राज्याच्या मुख्यालयात शेतकरी कक्षाची स्थापना केली आहे. विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून दूरध्वनीद्वारे चालू गळीत हंगामातील अडचणी, तक्रारी येथे नोंदवू शकतील. यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तक्रार नोंदविण्यासाठी कक्षाचा ०६१२-२९११०२६ हा क्रमांक देण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यांकडून वजनातील घट, कार्य क्षेत्राबाहेरील ऊस स्वीकारणे यांसह इतर मागण्यांबाबतच्या तक्रारी नोंदवू शकतात.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उद्योग विभागाचे आयुक्त गिरीवर दयाल सिंह यांच्या निर्देशानुसार सह आयुक्तांना शेतकरी तक्रार कक्षाचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. तर विभागीय पदाधिकारी हे कक्षाचे सदस्य असतील. येथील तक्रारी सोडविण्याच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here