बाजपूर साखर कारखान्याची डिस्टिलरी पीपीपी पद्धतीने चालविण्यास देण्यास विरोध

बाजपूर : साखर कारखान्याची डिस्टिलरी पीपीपी पद्धतीने भाडेतत्त्वावर देण्याच्या सरकारने जारी केलेल्या निर्णयाविरोधात नगराध्यक्ष गुरजितसिंग गित्ते यांच्यासह शेतकरी व कामगारांनी धरणे आंदोलन केले. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार, नगराध्यक्ष गुरजितसिंग गित्ते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीसमोर शेकडो लोक जमले. येथे लोकांनी सरकारचा निषेध केला. साखर कारखान्याच्या को-युनिट डिस्टिलरीला संजीवनी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र सरकारने आता ही डिस्टिलरी भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप लोकांनी केला. नगराध्यक्ष गुरजितसिंग गित्ते म्हणाले की, डिस्टिलरी हे साखर कारखान्याचे सह-युनिट आहे, मात्र सरकारने डिस्टिलरी पीपीपी पद्धतीने देण्यासाठी निविदा काढल्या आहेत. डिस्टिलरी पूर्वीप्रमाणे चालवावी आणि पीपीपी पद्धतीने चालविण्यास दिलेली निविदा रद्द करावी अशी आमची मागणी आहे. तसे न झाल्यास सर्व कामगार, शेतकरी या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन करतील. शेतकरी नेते प्रतापसिंग संधू, के. के. शर्मा, विशेष शर्मा, कुलदीप सिंग, तन्वीर खान आदींची भाषणे झाली. यावेळी यशपाल सिंग, शिवपूजन, कुलवंत, हरजीत, श्याम कार्तिक, प्रताप संधू, गुरदीप सिंग संधू आदी शेकडो लोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here