बेंगळुरू : कर्नाटकमध्ये १२ जूनपासून जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती बेंगळुरूच्या भारतीय हवामान विभागाचे ही. एस. पाटील यांनी दिली. यासोबतच राज्यात १२ आणि १३ जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
फक्त कर्नाटकच नव्हे तर ९ ते १५ जून या कालावधीत महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे. आयएमडीने सांगितले की, केरळमध्ये ११ ते १५ जून या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणात १२ ते १५ जून या काळात पुन्हा पाऊस होऊ शकतो. राजस्थान वगळता उत्तर- पश्चिम भारताच्या सर्व भागात १२ ते १४ जून यादरम्यान चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले.