बंगळुरू : हवामान विभागाने कर्नाटकच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांत १७ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. बेंगळुरूच्या हवामान विभागाचे संचालक सी. एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या किनारपट्टीचा भाग आणि दक्षिण कर्नाटकच्या आतील भागात रविवारीही जोरदार पाऊस झाला.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्तर कन्नड, उडूपी, दक्षिण कन्नड, शिवमोगा, चिकमंगळूर येथे जोरदार पावसाची शक्यता असल्याने १७ जूनपर्यंत ऑरेंज अॅलर्टची घोषणा करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या मते बंगळुरूमध्ये पुढील दोन दिवसांत आकाशात पावसाच्या ढगांची गर्दी असेल. शहरात हलका ते मध्यम पाऊस होईल. सोमवारी शहरातील किमान तापमान २१ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. तर सर्वाधिक तापमान २८ डिग्री सेल्सियस होते. पुढील एक -दोन दिवसांत यात बदल होण्याची शक्यता नाही.
मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असेल तर हवामान विभागाकडून ऑरेंज अॅलर्ट जाहीर केला जातो. हवामान विभाग ऑरेंज अॅलर्ट जारी करतो, याचा अर्थ खराब हवामानाची शक्यता आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link