हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
डेहराडून : चीनी मंडी
इकबालपूर साखर कारखान्याचे प्रशासक तथा भगवानपूरचे उप विभागीय अधिकारी संतोष कुमार यांनी निर्देशानुसार ऊस बिलांचे शेतकऱ्यांना वितरण होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.आगामी एका आठवड्यात शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी दहा कोटी रुपयांचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकांनी साखर कारखान्याचे अधिकारी आणि ऊस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत हे आदेश दिले.
यापूर्वी जिल्हाधिकारी दीपक रावत यांनी भगवानपूर येथील उपविभागीय अधिकारी संतोष कुमार यांना इकबालपूर साखर कारखान्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केले. शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले आणि साखरेची विक्री यासाठी प्रशासक नियुक्ती झाली आहे. प्रशासक संतोष कुमार यांनी आपल्या कार्यालयात साखर कारखान्याचे अधिकारी आणि इकबालपूर ऊस समितीचे अधिकारी यांची बैठक घेतली. पहिल्या टप्प्यात साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कारखान्याकडे पहिल्या टप्प्यातील ७२ कोटींची बिले देय आहेत. यातील ३६ कोटी रुपयांचे सॉफ्ट लोनसाठी एका बँकेची सहमती मिळाली आहे.
३६ कोटींच्या सॉफ्ट लोनसाठी पीएनबी बँकेसोबत लवकर बैठक होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना बिलांचे वितरण केले जाईल. याबाबत नियंत्रक संतोष कुमार यांनी सांगितले की, सध्याच्या हंगामात जेवढ्या साखरेची विक्री होईल, त्याच्या ७७ टक्के रक्कम शेतकऱ्यांना बिलांसाठी तर उर्वरीत रक्कम इतर खर्चासाठी वापरणे अपेक्षित होते. सद्यस्थितीत जेवढी साखर विक्री झाली आहे, त्यानुसार ८३ कोटी रुपयांची ऊस बिले अदा होणे गरजेचे होते. मात्र, साखर कारखान्याने फक्त ५९ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. त्यामुळे एका आठवड्यात दहा कोटी रुपयांची बिले देण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी ऊस विकास अधिकारी आशिष नेगी, ऊस समितीचे सचिव कुलदीप तोमर आदी उपस्थित होते.