पडरौना: डीएम यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे अधिकारी आणि डीसीओ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात बैठक घेतली. त्यांनी सप्टेंबरच्या शेवटपर्यंत उर्वरीत संपूर्ण थकबाकी भागवण्याचे निर्देश दिले. उदासीन अधिकार्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला.
डीसीओ वेदप्रकाश सिंह यांनी डीएम यांना सांगितले की, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम 2019-20 मध्ये दहा अब्ज एकतीस करोड चाळीस लाख पंच्याहत्तर रुपयांच्या ऊसाचे गाळप केले होते, ज्याच्या बदल्यात आतापर्यंत 8 अब्ज 93 करोड 40 लाख 9 हजार रुपये शेतकर्यांना दिले आहेत, जे एकूण देयाच्या 86.61 टक्के आहे. पण 1अब्ज 38 करोड 11 लाख 72 हजार रुपये अजूनही बाकी आहेत.
यावर डीएम यांनी साखर कारखान्यांचे अधिकारी आणि त्यांच्या प्रतिनिधींना कडक आदेश दिले की, सप्टेंबर च्या शेंवटपर्यंत संपूर्ण ऊसाचे पैसे कोणत्याही परिस्थितीत भागवावेत. अन्यथा कारवाई केली जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित साखर कारखान्याची असेल.
बैठक़ीमध्ये साखर कारखान्याचे यूनिट हेड कुलदीप सिंह आणि जीएम एसके त्रिपाठी, रामकोला साखर कारखान्याचे यूनिट हेड अनिल कुमार त्यागी तसेच फायनान्स हेड राजकुमार सिंह, कप्तानगंज साखर कारखान्याचे यूनिट हेड विनोद कुमार श्रीवास्तव आणि फायनान्स हेड आनंद कुमार सिंह, सेवरही साखर कारखान्याचे यूनिट हेड शेरसिंह चौहान, फायनान्स हेड बीएल विजय, ढाढा साखर कारखान्याचे यूनिट हेड करन सिंह, पिपराइच साखर कारखान्याचे हेड जितेंद्र कुमार श्रीवास्तव आणि फायनान्स हेड भीष्म सिंह बघेल आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.