रावळपिंडी: पाकिस्तानमध्ये साखरेचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत, हे पाहून याबाबत आता सरकारने गांभीर्याने विचार करून विभागीय आयुक्तांना खुल्या बाजारात साखरेचे दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालानुसार घाऊक बाजारात साखरेचे दर प्रतिकिलो 76 रुपये पर्यंत आहेत.
साखरेचे दर कमी करण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर रावळपिंडीतील जिल्हा प्रशासनाने घाऊक बाजारात साखरेची किंमत प्रतिकिलो 74 रुपये निश्चित केली. निर्देशांची अंमलबजावणी झाली आहे हे सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासन बाजारात छापा टाकण्याची शक्यता आहे.
किरकोळ विक्रेत्यांना 3 रुपये किलोने वाढ करून साखर विक्री करण्याची परवानगी होती, पण आता जिल्हा प्रशासनाने मार्जिन कमी करून 2 रुपये प्रति किलो केले. परंतु अहवालानुसार किरकोळ विक्रेत्यांनी ते कमी किंमतीत विकण्यास नकार दिला. किरकोळ विक्रेते असा दावा करतात की त्यांना वाहतुक आणि पॅकिंग साहित्याचा खर्च करावा लागतो. यासाठी त्यांना ३ रुपये प्रति किलो नफा आवश्यक आहे.
रमाझानमध्ये साखर 54 रुपये प्रति किलो होती, पण गेल्या दोन महिन्यात अचानक साखरेच्या किंमतीत वाढ झाली.
पाकिस्तान सरकारने जूनमध्ये साखरेसाठी प्रति किलो 3.3० रुपये कर लावला. बाजारात जास्त दरात साखर विकली जात होती. तसेच साखर होर्डिंगच्या तक्रारीनंतर सरकारने साखरेच्या होर्डिंग धारकांवर कारवाई सुरू केली आणि हजारो साखर पिशव्या जप्त केल्या.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.