रोहतक : हरियाणा सहकारी साखर कारखान्यांना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आता नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रोहतक साखर कारखाना आता अमेझॉन, बिग बास्केट, ग्रोफर्सच्या माध्यमातून छोट्या पॅकेट्स मध्ये साखर विक्री करणार आहे. तर महम साखर कारखान्याने सेंद्रिय गूळ आणि साखर उत्पादन सुरू केले आहे. त्याच्या विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा उपायुक्त कॅप्टन मनोज कुमार यांनी केले.
हरियाणा सहकारी साखर कारखाना पूर्वी फक्त उसाचे गाळप आणि साखर उत्पादन करीत होता. मात्र आता काहीतरी नवे उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोहतक साखर कारखान्याने चांगल्या गुणवत्तेच्या साखरेचे मार्केटिंग अमेझॉन, बिग बास्केट, ग्रोफर्ससारख्या ऑनलाईन पोर्टलवरुन सुरू केले आहे. तर महम कारखान्यात सेंद्रिय गूळ आणि साखर उत्पादन सुरू केले आहे. यात गुळाचे छोटे क्युब आणि ढेप असतील. साखरेचा दर ८० रुपये प्रति किलो आहे. तर क्युब गूळ ७० रुपये किलो आणि पेडी गूळ ६० रुपये किलो आहे. जर पाच किलो गूळ एकदम घेतला तर त्याचा दर ५० रुपये प्रति किलो असेल.
रोहतक विकास भवनमध्ये आज याची सुरुवात गूळ आणि साखर विक्री केंद्र सुरु करुन झाली. त्यांचे उद्घाटन जिल्हा उपायुक्त कॅप्टन मनोज कुमार यांनी केले. ही एक खूप चांगली सुरुवात आहे. साखर कारखाना गुणवत्तापूर्ण उत्पादनांचे मार्केटिंग करीत आहे असे ते म्हणाले. याची घरपोच डिलीव्हरी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. याशिवाय लवकरच ऑनलाईन पद्धतीने खरेदीची सोयही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.