कर्नाटक: मंड्यामध्ये ऑरगॅनिक गुळ उत्पादन युनिटचे उद्घाटन

मंड्या : ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्वावर जैविक (रसायनमुक्त) गुळ तयार करणारे युनिट व्हीसी फार्मचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. कृषी विज्ञान विद्यापीठाचे (यूएएस) कुलपती डॉ. एस. व्ही. सुरेश यांनी या युनिटचे उद्घाटन केले. खासगी घटकांच्या सहकार्याने रसायनमुक्त गुळाचे उत्पादन केले जाणार आहे. यावेळी एस. व्ही. सुरेश यांनी सांगितले की, ऑरगॅनिक गुळाचे उत्पादन करण्यासाठी शेतकरी आणि व्हीसी फार्मला गुणवत्तापूर्ण उसाचा पुरवठा करावा लागेल. ते म्हणाले, समाजाला रसायनमुक्त गुळ उपलब्ध करून देणे हे कृषी विद्यापीठाचे धेय्य आहे.

सद्यस्थितीत कोणत्याही उपकरणाशिवाय पिकाचे उत्पादन करणे कठीण आहे. ते म्हणाले की, आधुनिक उपकरणांच्या वापरावर अधिक भर देणे गरजेचे आहे. युवकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर रोखले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषी यंत्रांचा वापर करुन वेळेची बचत करावी. सध्या कृषी संशोधन केंद्रांमधील कृषी समुदायांना अडचणीच्या ठरतील अशा मुद्यांचा शोध घेतला जात आहे. कृषी विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधन केंद्रांवर शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here