सोलापूर : वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, सहकार शिरोमणी स्व. वसंतराव (दादा) काळे यांची २२ वी पुण्यतिथी व ८० व्या जयंतीनिमित्त कल्याणराव काळे बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने २ ते ९ फेब्रुवारीअखेर कारखाना कार्यस्थळावर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी ही माहिती दिली. यंदा आळंदी येथील माऊली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ महाराज धनुरे यांच्या गाथा भजनासह काकडा, हरिपाठ, भजन व प्रसिध्द कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर, हभप जयवंत महाराज बोधले यांच्यासह नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन रोज संध्याकाळी ८ ते १० यावेळेत आयोजित केले आहे.
२ फेब्रुवारी रोजी हभप धनंजय महाराज गुरव, धोंडेवाडी यांच्या कीर्तनाने कीर्तन सोहळ्यास प्रारंभ होईल. ३ फेब्रुवारीला कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर, ४ फेब्रुवारीला कृष्णा महारा चवरे पंढरपूर, ५ फेब्रुवारीला श्रीक्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थानच्या महंत राधा महाराज आईसाहेब, ६ फेब्रुवारीला रुपेश महाराज चौगुले भाळवणी, ७ फेब्रुवारीला चकलंबा बीड येथील श्रीक्षेत्र सद्गुरू कल्याण स्वामी संस्थानच्या साध्वी सोनाली करपे, ८ फेब्रुवारीला करमाळा तालुक्यातील कात्रज येथील हनुमंत महाराज मारकड यांचे कीर्तन होणार आहे.. ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता पंढरपूर येथील कीर्तनकार ह. भ. प. जयवंत महराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने तसेच गाथा भजनाने कीर्तन सोहळ्याची सांगता होणार आहे. यावेळी वसंतदादा काळे मेडिकल फाऊंडेशन संचलित पंढरपूर येथील जनकल्याण हॉस्पिटलच्यावतीने ९ फेब्रुवारी रोजी दु.१२ ते ३ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.