ओलम शुगर्सतर्फे ऊस उत्पादकता वाढ अभियानाचे आयोजन

कोल्हापूर : ओलम शुगर्सने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. गडहिंग्लज उपविभागामध्ये ओलम शुगर्स ऊस विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी ऊस संशोधन केंद्र (पुणे) या संस्थेच्या अधिकाऱ्यांचा ऊस पीक शिवार फेरी व अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. ओलम शुगर्सतर्फे ऊस उत्पादकता वाढ अभियान शुक्रवार (दि. ४) ते रविवार (दि.६) यादरम्यान होणार असल्याची माहिती ‘ओलम’चे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली.

चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील ऊस उत्पादन वाढावे यासाठी ओलम शुगर्सतर्फे प्रयत्न केले जात असल्याची माहिती कुंडल यांनी दिली. या अभियानात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) चे अधिकारी ए.डी.कडलग व जे.एम.रेपाळे हे मार्गदर्शन करणार असून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here