सांगली: नागेवाडी येथे भारती शुगर्स अँड फ्युअल्स प्रा. लि.च्या कार्यस्थळी कारखान्याच्या मार्गदर्शिका भारतीताई महेंद्र लाड यांच्या वाढदिवसानिमित वृक्षारोपण करण्यात आले. संस्थापक, चेअरमन स्व. संपतराव (नाना ) माने यांच्या पुतळयाजवळ विशेष लेखापरिक्षक वर्ग १ (साखर) शीतल चोथे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यापूर्वी पर्यावरण दिनानिमित्त कारखान्यामार्फत १०४० विविध झाडांचे रोपण करण्यात आले.
कारखान्यातील मुख्य खातेप्रमुखांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील, लेखापरीक्षक रमेश वनखंडे, चीफ इंजिनिअर एम. एस. पाटील, चिफ केमिस्ट व्ही. पी. सूर्यवंशी, फायनान्स मॅनेजर पी. पी. पाटील, प्रसाद गोकावे शेती अधिकारी संजय मोहिते यांच्यासह शेतकरी सभासद, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.