लातूर : देवणी तालुक्यातील तळेगाव जागृती शुगर अँड अलाईड कारखान्यातर्फे व शासनाच्या आरोग्य विभागातर्फे जवळगा आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात ऊसतोड मजूर व कामगारांसाठी दुसऱ्या टप्यातील आरोग्य तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर व लसीकरण आणि सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले.
शिबिरात डॉ. राहुल गौरकर, डॉ. मोना सरवदे, कारखान्याचे आरोग्य अधिकारी डॉ. श्याम हिबाने यांनी आरोग्य तपासणी व सेवा दिली. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले, लक्ष्मण बिरादार, रामदास साळुंखे, राजकुमार कांबळे, महेश बंडे, अनिल कदम, जनार्दन आलमले, सरपंच विजयकुमार पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव पाटील, अनिल पाटील यांच्यासह ऊसतोड मजूर, मुकादम, चालक आणि कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.