ओलाम अग्रो इंडिया तर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

यह न्यूज़ सुनने के लिए इमेज के निचे के बटन को दबाये

ओलाम अग्रो इंडिया प्रायव्हेट लि. राजगोळी व सॉलिडरीडॅड यांचा संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये कारखाना क्षेत्रातील ८०० हून अधीक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शास्वत आणि फायदेशीर शेती साठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे, यामध्ये नेटाफेमचे इरीगेशन चे मा. श्री.अरुण देशमुख “ऊस ठिबक सिंचन व्यवस्थापन”, व्ही. एस . आय. ,पुणे चे माजी शास्त्रज्ञ मा. श्री. एस. बी. माने- पाटील ” ऊस कीड व रोग नियंत्रण “, व्ही. एस .आय.,पुणे चे माजी शास्त्रज्ञ मा. श्री. आबासाहेब साळुंखे ” अन्न द्रव्य व्यवस्थापन या विषयांवरती मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे उदघाट्न मा. श्री. संजय सचेती साहेब (Country Head-Olam) मा. श्री.भरत कुंडल ( Business Head-Sugar-India) या मान्यवरांचा हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
मा. श्री. सचिन रावल (सह-संचालक, साखर कोल्हापूर विभाग ,कोल्हापूर )
मा. श्री. विनोद रणनवरे (तहसीलदार, चंदगड)
मा. श्री. ज्ञानदेव वाकुरे (जिल्हा कृषि अधिकारी ,कोल्हापूर )
मा.डॉ. आर. पी. सिंग (ऊस सल्लागार, आय . एफ. सी.)
मा. श्री. शिवप्रसाद यादव (पोलीस निरीक्षक, चंदगड)
मा. श्री. मोह्हमद दिलशाह (प्रकल्प व्यवस्थापक-सॉलिडरीडॅड)
मा. श्री. किरण पाटील (तालुका कृषी अधिकारी चंदगड) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदरचा हा कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर मंगळवार दि. २८ मे २०१९ रोजी सकाळी ठिक १०. ०० वाजता होणार आहे, शेतकरी मेळावा, त्याच बरोबर शेती उपयोगी अवजारे व साधनांचे प्रदर्शन आयोजित केले आहे असे निवेदन श्री. सुधीर पाटील (मुख्य शेती अधिकारी ) व श्री जसवीर राखा (व्यवस्थापक- मानव संसाधन ) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here