उस्मानाबाद : जिल्ह्यातील साखर कारखान्यासमोर ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
गेल्या काही वर्षांपासून हा साखर कारखाना बंद आहे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादकांचे हाल आहेत. ऊस लांब अंतरावरील साखर कारखान्याला पाठवावा लागत असल्याने शेतकऱी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनावेळी कोरोना महामारी रोखण्यासाठी लागू केलेल्या कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे सांगण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, ट्रॅक्टर, बैलगाडीत बसून आंदोलनस्थळी आलेल्या अनेक कार्यकर्ते, शेतकरी तसेच कारखान्याच्या करमचाऱ्यांनी मास्क लावले नव्हते. याशिवाय, सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचाही फज्जा उडाला.