न्यूयॉर्क: कोका-कोला ने शुक्रवारी घोषणा केली की, उत्तर अमेरिकेमध्ये 4,000 कर्मचार्यांची कपात करण्यात येणार आहे. जी कंपनीला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी केली जात आहे. कंपनीनुसार कोरोना दरम्यान त्यांना खूपच कमी फायदा झाला आहे. खेळ, चित्रपटगृहे आणि मनोरंजन स्थळे कोरोना चा फैलाव रोखण्यासाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात 32 टक्के घट नोंदली गेली आहे.
अमेरिकेचा प्रतिष्ठीत ब्रॅन्ड कोका-कोला डझनभर ज्यूस, पाणी आणि पेयाचा निर्माता आहे. त्यांनी सांगितले की, सध्या 17 पैकी 9 व्यावसायिक प्लँट्समध्ये कपात करण्याची योजना आहे. पण कर्मचार्यांना काढून टाकले तरी 350 ते 550 मिलियन डॉलर त्यांच्या नुकसान भरपाईवर खर्च केले जाणार आहेत. कोका-कोलाने आज जारी केलेल्या निवेदनात कंपनीने सांगितले की, कंपनीने ऐच्छिक सेवानिवृत्ती कार्यक्रम जाहीर केला आहे, ज्यायोगे पात्रता पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर स्वतंत्र पॅकेज घेण्याचा पर्याय मिळेल.
कोका-कोला कडून सांगण्यात आले आहे की, कार्यक्रम संयुक्त लाभ देईल. आणि सर्वात पहिल्यांदा संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडा आणि प्यूटो रिको मध्ये जवळपास 4,000 कर्मचार्यांना सामिल केले जाईल. अनैच्छिक कपात कमी करण्यासाठी इतर देशांमध्येही अशीच ऑफर देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे, परंतु अद्याप त्यासंदर्भात तपशील देण्यात आलेला नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.