बागपत : जिल्ह्यात ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाचा फैलाव वाढला आहे. पिकावर रोग पसरल्याने नव्या पानांखाली पांढऱ्या रंगाचे डास दिसून येत आहेत. पानेही कुरतडली गेली आहेत. वेळवर उपाययोजना न केल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे,
जिल्हा कृषी सुरक्षा अधिकारी डॉ. सूर्य प्रताप सिंह म्हणाले, फ्यूजेरियम मानिलीफोरम या किटकामुळे ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाचा फैलाव होतो. वेळेवर किटकनाशकाची फवारणी न केल्यास पिकाचे नुकसान अधिक होते. पिक वाचवण्यासाठी कार्बन्डेझीम ५० डब्ल्यीपी एक किलो या प्रमाणात अथवा कॉपर ऑक्सीक्लोराई़ड 50 डब्लूपी 500 ग्रॅम अथवा मॅनकोजेब ७५ डब्ल्यूपी दोन से अडीच किलो पाचशे ते सहाशे लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास पिकाचा रोगापासून बचाव करता येतो. रोगाचा फैलाव अधिक असल्यास दर पंधरा दिवसांनी फवारणी करणे गरजेचे आहे.