वॉशिंग्टन: अमेरिकेमध्ये कोरोना वायरस चा कहर थांबतच नाही. अमेरिकेमध्ये कोरोनाचे एका दिवसात विक्रमी रुग्ण समोर आले आहे. आतापर्यंत च्या सर्वात अधिक रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी नुसार, अमेरिकेमध्ये गुरुवारी गेल्या 24 तासात कोविड-19 चे 2,10,000 पेक्षा अधिक नवे रुग्ण समोर आले आहेत. हा आकडा अमेरिकेमध्ये महामारी सुरु झाल्यानंतरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. अमेरिका हा कोरोनामुळे सर्वात अधिक प्रभावित देश आहे.
यूनिवर्सिटी च्या आकड्यांनुसार, यूएस मध्ये गुरुवारी गेल्या 24 तासात 2.10 लाख पेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनामुळे 2,907 लोकांचा मृत्यु झाला आहे. अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमणाच्या एकूण केसेस 1.40 करोड च्या जवळपास पोचल्या आहेत. तर आतापर्यंत वायरसमुळे 2.73 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यु झाला आहे. अॅक्टिव्ह केसची संख्या 83 लाखापेक्षा अधिक आहे.
तर भारतामध्ये कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 95 लाखावर पोचली आहे. भारतामध्ये वायरस मुळे 1.38 लाख लोकांचा जिव गेला आहे. आतापर्यंत 89 लाखपेक्षा अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशामध्ये 4.22 लाख लोकांवर उपचार सुरु आहे.