पीलीभीत : लाल सड रोगाचा उसावर मोठ्या प्रमाणात फैलाव दिसू लागला आहे. या रोगाची लागण झालेला तयार झालेला ऊस वाळला आहे. शेतकऱ्यांना आता कामगारांची मदत घेऊन असा ऊस काढून टाकावा लागत आहे. यासोबतच त्यांना आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.
पूरनपूर तालुक्याती बहुसंख्य शेतकरी ०२३८ या प्रजातीच्या उसाची लागवड करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने रेड राड (लाल सड) रोगाचा फैलाव होत आहे. याला उसाचा कॅन्सर असेही म्हटले जाते. अनेक शेतकऱ्यांचा ऊस चांगला तयार झाला आहे. आगामी दोन महिन्यात तो कारखान्याला पाठवला जाईल. मात्र, अशा क्षेत्रावर या रोगाचा फैलाव दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी रोगग्रस्त ऊस वाळू लागला आहे. शेतकऱ्यांनी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किटकनाशकांची फवारणीही केली. मात्र, फारसा फायदा मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांनी कामगारांची मदत घेऊन असा ऊस शेतातून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ऊस वाळण्यासह तो बाहेर काढून टाकताना त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या रोगामुळे खूप नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ७० ते ७५ टक्के उस ०२३८ या प्रजातीचा आहे. या जातीच्या उसावर लाल सड रोगाचा अधिक फैलाव झाला आहे. रोगग्रस्त ऊस वाळतो. तो शेतकऱ्यांनी शेतातून बाहेर काढून टाकावा. रोगग्रस्त ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकावी असा सल्ला वरिष्ठ कृषी संशोधक डॉ. एस. एस. ढाका यांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शेती करतो. मात्र, लाल सड रोगामुळे ऊस वाळत आहे. त्यामुळे नुकसान झाले. आता नव्या प्रजातीच्या उसाची लागवड करणार आहे असे शेतकरी संदीप सिंह यांनी सांगितले. तर आधीपासूनच उसावर या रोगाचा फैलाव होत आहे. आता १५०२३ या प्रजातीचा ऊस लावणार आहे. याशिवाय पूरक पिकावरही भर देणार असल्याचे शेतकरी रामकिशन यांनी सांगितले. विभागातील अनेक गावांमध्ये उसावर या लाल सड रोग फैलावला असल्याचे शेतकरी बृजपाल यांनी सांगितले. शेतकरी जगन्नाथ वर्मा यांच्या तीन एकर शेतावर या रोगचा फैलाव दिसला असून औषधांची फवारणीही केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ०२३८ ऐवजी शेतकऱ्यांनी १५०२३ या प्रजातीची लागवड करावी असे पीलीभीत एलएच कारखान्याचे ऊस विभागाचे महाप्रबंधक जितेंद्र सिंह यांनी आवाहन केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link