सातारा : भारतीय शुगरतर्फे ओव्हर ऑल बेस्ट परफॉर्मन्सबद्दल खटाव-माण साखर कारखान्याला पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे साखर कारखानदारीमधून कारखान्याचे कौतुक होत आहे. हा पुरस्कार आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे, को- चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे अशी प्रतिक्रीया कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांनी दिली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
कारखान्याच्या वतीने कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालक कृष्णात शेडगे, टेक्निकल डायरेक्टर नरेंद्र साळुंखे, सनी क्षीरसागर, जीएम अशोक नलावडे, प्लांट हेड काकासाहेब महाडीक, जीएम प्रोसेस कदम, चीफ अकौंटन मोरे, प्रज्ज्वल घोरपडे व जितेंद्र घोरपडे यांनी स्वीकारला. खटाव – माण कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे म्हणाले की, दुष्काळी भागात अत्यंत कठीण परिस्थितीत खटाव- माण साखर कारखान्याने येथील आर्थिक जीवनमान उंचावण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. कारखान्याने पाचही गळीत हंगामात विक्रमी उसाचे गाळप करून शेतकऱ्यांना उच्चांकी दर देऊन वेळेवर त्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.