रुडकी : इकबालपूर साखर कारखान्यात हरियाणातील शेकडो शेतकरी आणि भारतीय किसान युनियनचे नेते, राकेश टिकैत यांनी धडक दिली. ऊसाच्या प्रलंबित बिलांबाबत त्यांनी कारखाना प्रशासनासोबत चर्चा केली. यावेळी कारखाना प्रशासनाने लवकरात लवकर बिले देण्याचे आश्वासन त्यांना दिले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांच्यासह हरियाणातील शेतकरी संध्याकाळी इकबालपूर साखर कारखान्यात पोहोचले. त्यांनी साखर कारखान्यात उपस्थित असलेले ऊस व्यवस्थापक ओमपाल तोमर यांच्याशी ऊस बिलांबाबत चर्चा केली. हरियाणातील शेतकरी सोनू मालपुरी यांनी सांगितले की, त्यांच्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास ३४ कोटी रुपये इकबालपूर साखर कारखान्याकडे थकीत आहेत. हे पैसे अद्याप देण्यात आलेले नाहीत. ऊस बिलांच्या थकबाकीबाबत ऊस व्यवस्थापक ओमपाल सिंह तोमर यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी लवकरच बिले अदा केली जातील असे आश्वासन दिले.