लखनौ : उत्तर प्रदेशमधील अबकारी तथा साखर उद्योग, ऊस विकास विभागाच्यावतीने राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन जेनरेटर्स स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी ७५ जिल्ह्यातील रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. काही रुग्णालयांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन जनरेटर्स स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरीत जिल्ह्यांमध्ये युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.