हरदोई : जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांनंतर साखर कारखाना प्रशासनाच्यावतीने एक चांगली उपाययोजना सुरू होत आहे. साखर कारखाना व्यवस्थापनातर्फे जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी ही माहिती दिली.
कोविड १९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट सुरू केला जाणार आहे. त्यासाठी कारखाना प्रशासनाला जागा उपलब्ध करून दिली जाईल. तेथे हा प्लान्ट सुरू होईल. याशिवाय संडिला, बावन आणि शाहाबाद येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये आमदार निधीतून ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोविड एल टू श्रेणीतील आरोग्य केंद्रांत १३० बेड आणि जिल्हा रुग्णालयात नॉन कोविड पेशंटसाठी ऑक्सिजनयुक्त ३० बेडची व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी इतर जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवला जातो. डीएससीएल शुगर ग्रुपने त्यांच्या मागणीनंतर ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय परिसरात मेडिकल कॉलेजद्वारे केल्या जाणाऱ्या कामकाजाजवळ जागा देण्यास सांगण्यात आले आहे. इंजिनीअर्सच्या देखरेखीखाली हे काम सुरू होईल. येथे जादा ३० बेड ऑक्सिजनयुक्त तयार होतील.
संडीला, शाहाबाद आणि बावन येथेही ऑक्सिजन प्लान्ट सुरू केले जातील. बावन आरोग्य केंद्रात आमदार नितीन अग्रवाल, संडीला येथे अवनिश सिंह आणि शाहाबाद येथे आमदार रजनी तिवारी यांनी प्लान्टसाठी आपला निधी देण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी लघू उद्योग महामंडळाकडून अंदाजपत्रक मागविण्यात आले आहे.