शामली : कोरोनाशी लढण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये ५० साखर कारखाने ऑक्सिजन प्लांट स्थापन करणार आहेत अशी माहिती ऊस मंत्री सुरेश राणा यांनी दिली. यामध्ये शामली, ननौता, देवबंद या साखर कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णांना सहारनपूर मेडिकल कॉलेजमध्ये तातडीने दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे. जिल्ह्यातील मुख्य रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी सर्व सीएचसी आणि पीएचसीमध्ये ऑक्सिजन, ऑक्सिमीटर, रेमडेसिवीरसह सर्व सुविधा दिल्या जातील असे त्यांनी सांगितले.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ऊस मंत्री सुरेश राणा, कैरानाचे खासदार प्रदीप चौधरी, आमदार तेजेंद्र निर्वाल यांनी कोरोना स्थितीचा आढावा, परिस्थिती सुधारण्यासाठी उपाय यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आपल्या कामकाजात बदल करायला हवा. जिल्ह्यातील सर्व गावे सॅनिटाइझ केली जातील. सीडीओ, सरपंच, नगरपालिका अधिकारी यांसोबत बैठक घेऊन कार्यक्रम ठरवला जाईल. कोविड रुग्णालयात रुग्णांची माहिती देण्यासाठी जनसंपर्क अधिकारी तैनात केले जातील.
मंत्री राणा यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितले की, आवश्यक सुविधा, ऑक्सिमीटर, रेमडेसिवीर, ऑक्सिजन आदींची यादी तयार करून द्यावी. कैरानाचे खासदार प्रदीप चौधरी म्हणाले, सर्व उपकरणे, औषधे सीएचसी, पीएचसीमध्ये उपलब्ध करून द्यावी. रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी चांगले वर्तन केले गेले पाहिजे अशा सूचना कर्मचाऱ्यांना द्याव्यात.
जिल्हाधिकारी जसजित कौर यांनी सांगितले की, दररोज ३५०-४०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. दररोज २००० जणांची तपासणी केली जाते. १ लाख ५९ हजार घरांचा सर्व्हे करून २१५२ जणांची निवड केली आहे. त्यांना औषधांचे किट दिली आहेत. कोविडमध्ये १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बैठकीला पोलिस अधीक्षक सुकिर्ती माधव, मुख्य कार्यकारी अधिकारी शंभुनाथ तिवारी, एडीएम अरविंद कुमार सिंह, डॉ. संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.