ऑक्सीजन तुटवड्याचे संकट, देशात ३ लाख ४६ हजार नवे रुग्ण, २६२४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात आज, शनिवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत कोरोनाच्या रुग्णांत उच्चांकी वाढ दिसून आली आहे. गेल्या २४ तासांत नवे ३,४६,७८६ रुग्णआढळले आहेत. तर २६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या कालावधीत २,१९,८३८ जण पूर्णपणे बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत देशात एकूण १,६६,१०,४८१ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १,३८,६७,९९७ जण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनामुळे उच्चांकी रुग्ण सापडत असताना देशाची राजधानी दिल्लीसह इतर ठिकाणच्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची कमतरता दिसून येत आहे. दिल्ली आणि अमृतसरमध्ये ऑक्जिसनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला. दिल्लीच्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलचे एमडी डी. के. बलूजा यांनी सांगितले की काल संध्याकाळी ऑक्जिसनच्या कमतरतेमुळे २० गंभीर रुग्णंचा मृत्यू झाला. अशाच पद्धतीने पंजाबमध्ये अमृतसरच्या एका खासगी, नीलकंठ हॉस्पिटलमध्येही ऑक्सिजनअभावी ५ रुग्णांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलच्या प्रशासनाने ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here