अहमदनगर : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर न्यायालयाने १२ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दि. २३ सप्टेंबर २०१६ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. आताही पाणी सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्यानंतर डॉ. विखे पाटील कारखान्याने त्याअंर्तगत विशेष अनुमती याचिका दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल करून पाणी सोडण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. या याचिकेची सुनावणी २१ नोव्हेंबर २०२३ रोजी झाली. डॉ विखे—ाटील साखर कारखान्याच्या वतीने ॲड. रोहतगी, ॲड. नायडू, संजय खर्डे यांनी बाजू मांडली.