पाकिस्तान: साखर कारखान्यांविरोधात मिळाल्या 100 तक्रारी

बहवलपूर, पाकिस्तान: पाकिस्तानच्या बहवलपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास शंभर ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी कारखान्यांविरोधात अ‍ॅन्टी करप्शन इस्टेब्लिशमेंट (एसीई) ला तक्रारी सादर केल्या. पंजाब सरकारने पूर्ण प्रांतामध्ये साखर कारखान्यांकडून वजन आणि किंमतींमध्ये अनावश्यक कपाती बाबत ऊस शेतकर्‍यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पाउल उचलले आहे.

एसीई चे सहायक निदेशक राणा मुहम्मद अरशद यांच्या नुसार, ऊस शेतकर्‍यांकडून अधिक तक्रारींची आशा होती. त्यांनी सांगितले की, सरकारच्या धोरणांतर्गत आम्ही कारखान्यांविरोधात त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ऊस शेतकर्‍यांच्या घरी जात आहोत. दरम्यान, विभागीय आयुक्त असिफ इकबाल चौधऱी यांनी अधिकार्‍यांना निर्देश जाहिर केले की, त्यांनी महामार्गांवरील रहदारी सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. ज्यामुळे गाळप हंगामा दरम्यान साखर कारखान्यांचे नुकसान होवू नये. आयुक्तांनी ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर वाहनांद्वारा ऊस ओवरलोडिंग रोखणे आणि धूर सोडणार्‍या वाहनांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले.

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here