इस्लामाबाद : देशात गेल्यावर्षी झालेल्या ७.५ मिलियन टनाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात दोन मिलियन टनाची वाढ होईल अशी शक्यता असल्याचे अर्थ आणि महसूल मंत्री शौकत तारिन यांनी सांगितले.
याबाबत एका ट्विटमध्ये मंत्री तारीन यांनी म्हटले आहे की, उच्चांकी साखर उत्पादनाने, पाकिस्तान साखर तुटवडा असलेल्या देशांच्या यादीतून अतिरिक्त साखर उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत आला आहे. ते म्हणाले की, एक्स मील साखरेचा दर अद्याप ८१ रुपये (पाकिस्तानी चलन) प्रती किलो आहे. हा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत २० लाख टनाने वाढून ७५ लाख टन होण्याची शक्यता आहे. एक्स मिल साखरेचा दर आता गेल्यावर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. देशात महागाईने हवालदिल झालेल्या ससामान्य नागरिकांसाठी ही खूप दिलासादायक बाब आहे.
पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून साखरेच्या तुटवड्याचे संकट होते. त्यामुळे नागरिकांमध्ये सरकारविरोधात रोषही खूप वाढला होता.