इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने देशभरातील साखर कारखान्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला बुधवारी गती दिली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीबाबत निर्णय घेण्यात आला. संघराज्ये आणि प्रांतातील मंत्री, सचिव, मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत फेडरल ब्यूरो ऑफ रेव्हेन्यूद्वारे (एफबीआय) साखरेबाबत प्रांतांमधील सरकारांकडून वसूल केल्या जाणाऱ्या करांसंबंधीची एकत्रित माहिती देण्याचे ठरले.
यावेळी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सवलतीच्या धान्य दुकानांमध्ये केली गेली पाहिजे. गहू, साखरेसह अन्य आवश्यक वस्तूंची नेमकी गरज किती आहे आणि उपलब्धता याबाबतचे अनुमान लवकर निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.