अफगाणिस्तानला विकलेली साखर पाकिस्तानने अडवली

नवी दिल्ली : भारतातून अफगाणिस्तानला जाणारी साखर पाकिस्तानने अडवली आहे. भारताची साखर खाण्यास योग्य नसल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. भारत-अफगाणिस्तान व्यापार संबंध बिघडवण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानने भारताची साखर त्यांच्या प्रयोगशाळांमध्ये टेस्ट केली आहे. त्याचा अधिकृत अहवाल जाहीर करत भारताची साखर माणसाला खाण्यास योग्य नसल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

भारतातून अफगाणिस्तानला पाकिस्तान मार्गे ४ हजार ४७२ टन साखर पाठवण्यात आली आहे. पाकिस्तानने कुरघोडी करत भारताच्या २५८ कंटेनरपैकी १७२ कंटेनरमधील साखर तपासली आहे. तर, उर्वरीत २ हजार २३६ टन (८६ कंटेरनर) साखरेची अजून चाचणी करण्यात येत आहे. साखर तपासल्यानंतर ही साखर मुदत संपलेली असून, त्याचा वास येत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. भारताच्या साखरेला ब्राऊनिश रंग असल्याचे पाकने म्हटले आहे. या साखरेमुळे अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे पाकने म्हटले आहे.

या संदर्भातील अहवाल प्रसिद्ध करताना समाजाचे संरक्षण करण्यात आंम्ही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. मुळात भारताप्रमाणे पाकिस्तानातही अतिरिक्त साखरेचा प्रश्न आहे. चीनने गेल्या हंगामात भारताची साखर खरेदी करण्याची तयारी दर्शवली होते. चीनच्या शिष्टमंडळाने भारतात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना भेटही दिली होती. परंतु, भारताला मागे टाकून पाकिस्तानने आपली साखर चीनला विकली.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here