इस्लामाबाद : अफगाणिस्तानमध्ये साखर तस्करीचे सर्व आरोप पाकिस्तानच्या युटिलिटी स्टोअर्स कॉर्पोरेशनने फेटाळले आहेत. जवळपास २,५०,००० मेट्रिक टन साखर तस्करी करून पाठविण्यात येत होती. मात्र ही साखर कोणत्याही युटिलीटी स्टोअरवर उपलब्ध नाही असा आरोप एका रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. हा अहवाल यूएससीने खोडून काढला आहे.
सद्यस्थितीत पाकिस्तानमध्ये देशांतर्गत साखरेची गरज भागविण्यासाठी आयात करण्यात येत आहे. अनुदानीत दरांवर त्याचा पुरवठा केला जात आहे. ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानद्वारे (टीसीपी) आयात केलेली ३३,००० टन साखर घेऊन जाणारे एक जहाज कराची पोर्ट ट्रस्टवर (केपीटी) दाखल झाले आहे. त्याचे अनलोडिंग सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर ही साखर युएससीला देण्यात येणार आहे, असे सुत्रांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link
Home Marathi International Sugar News in Marathi अफगाणिस्तानला साखर तस्करीचे आरोप पाकिस्तानने फेटाळले