हैदराबाद,(पाकिस्तान) : रविवारी हैदराबादमध्ये सिंध सेटलमेंट बोर्ड (एसएबी) ची मासिक बैठक झाली. एसएबीचे अध्यक्ष महमूद नवाज शाह यांनी अजेंड्यावरील अनेक मुद्दे मांडले. यात भात, कापूस आणि उसाचे भाव आणि अप्पर सिंध तांदूळ पट्ट्यातील उजव्या काठाच्या कालव्याच्या सिंचनाच्या पाण्याची समस्या समाविष्ट होती. तर रुपयाचे मूल्य वाढले असताना यंदा भाताचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही असे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.
एसएबीच्या अध्यक्षांनी सांगितले की, साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊनही सिंध सरकारने उसाच्या अधिकृत दराची अधिसूचना जारी केलेली नाही. गेल्या ३५ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे असे ते म्हणाले.