लाहोर : पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या गव्हाच्या संकटादरम्यान, शेतकऱ्यांची प्रमुख संघटना पाकिस्तान किसान इत्तेहादने (पीकेआय) ने देशात कृषी आणीबाणी लागू करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. याबाबतचे वृत्त द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिले आहे. याबाबत एका पत्रकार परिषदेत बोलताना पीकेआयचे अध्यक्ष खालिद महमूद खोखर यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. या धोरणांमुळेच देशाला २०२३ मध्ये गव्हाची खरेदी करण्याची गरज भासत आहे, असा दावा त्यांनी केला. पीकेआयचे नेते खोखर यांनी बाजारात खतांची टंचाई असल्याचाही उल्लेख कला. या प्रश्नाबाबत सरकारने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली. खोखर म्हणाले की, औद्योगिक कच्च्या मालाच्या रुपात वापरल्या जाणाऱ्या पिकांचे कमी उत्पादनासह खतांच्या टंचाईचाही परिणाम निर्यातीवर होणार आहे.
सिंधने पिकेआर ४,००० प्रती मण गव्हासाठी समर्थन मूल्य निश्चित केले आहे. तर पंजाब आणि खैबर-पख्तूनख्वा या प्रांतांनी कोणतीही घोषणा केलेली नाही. खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांमध्ये अनेक विभागात गव्हाची टंचाई आणि तो मिळविण्यासाठी सुरू असलेली धावपळ यासोबतच पाकिस्तान आटा टंचाईच्या सर्वाधिक गंभीर स्थितीचा सामना करीत आहे. द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने सांगीतले की, पाकिस्तानमध्येसुरू असलेल्या संकटादरम्यान गहू आणि आट्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
कराचीमध्ये आटा १४० रुपये प्रती किलो ते १६० रुपये प्रती किलो दराने विकला जात आहे. इस्लामाबाद आणि पेशावरमध्ये १० किलो आट्याची बॅग १,५०० रुपये प्रती किलोने विक्री सुरू आहे. तर २० किलो आटा २,८०० रुपये दराने विक्री केला जात आहे. पंजाब प्रांतामध्ये कारखानदारांनी आट्याची किंमत १६० रुपये प्रती किलो केली आहे. बलुचिस्तानधमध्ये अन्न मंत्री जमारक अचकजई यांनी सांगितले की, प्रांतामध्ये गव्हाचा साठा पूर्णपणे समाप्त झाला आहे. ते म्हणाले की, बलुचिस्तानला त्वरीत ४,००,००० पोती गव्हाची गरज आहे. अन्यथा हे संकट आणखी गडद होऊ शकेल असा इशारा त्यांनी दिला.