हॅम्बर्ग : पाकिस्तानमधील व्यापारी संस्था, ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने (टीसीपी) ५०,००० टन साखर खरेदीसाठी जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय निविदेला सर्वात कमी ५३३ $ प्रती टनची ऑफर मिळाली आहे. पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी हे वृत्त दिले आहे.
दरम्यान, आलेल्या प्रस्तावावर टीसीपीकडून अद्याप विचार सुरू आहे. साखर खरेदी करण्यास मंजुरी मिळालेली नाही असे सांगण्यात आले. सर्वात कमी दराचा प्रस्ताव अल खलीज शुगरने (एकेएस) दिल्याचे सांगण्यात येते. सादर झालेल्या निविदांमध्ये सक्डेन – $ ५६४.९०, ड्रेफस – $ ५५०.०० आणि विल्मर – $५४२.९० अशा कंपन्यांच्या ऑफर आहेत. जुलै २०२० मध्ये पाकिस्तान सरकारने देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर रोखण्यासाठी साखर आयातीला मंजुरी दिली होती. अलिकडेच टीसीपीने आयात साखरेच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. नव्या निविदांमध्ये साखरेचे वितरण त्वरीत करण्याची मागणी आहे. पहिल्या २५ दिवसांत २५,००० टन साखर वितरणाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.