इस्लामाबाद : गेल्या अनेक महिन्यांपासून कारखानदारांकडून केली जाणारी मुख्य मागणी मंजूर करताना पाकिस्तान सरकारने सोमवारी १,००,००० ते १,५०,००० टन साखर निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा निर्णय अर्थ मंत्रालयामध्ये आयोजित एका बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि संशोधन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
प्रसार माध्यमातील वृत्तांनुसार, सध्याच्या साठ्याची स्थिती आणि ऊस गळीत हंगामाच्या सुरुवातीची स्थिती पाहता सरकार किमान १,००,००० टन साखर निर्यातीस परवानगी देईल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, १,५०,००० टनापर्यंत निर्यातीस परवानही दिली जावू शकते.
रिपोर्टनुसार, साखर निर्यात आणि त्याचे प्रामण किती असावे याचा अंतिम निर्णय कॅबिनेटच्या आर्थिक समन्वय समितीच्या (ईसीसी) बैठकीत घेतला जाईल.
यांदरम्यान, पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने (PSMA) जोपर्यंत १० लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत नवा गळीत हंगाम सुरू करणार नाही असा इशारा सरकारला दिला होता.