इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने कारखान्यांना वेळेवर गळीत हंगाम सुरू करणे आणि स्थानिक बाजारपेठेत आपल्याकडील साठ्याची विक्री करण्यास सांगण्याऐवजी साखर निर्यातीचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त जियो न्युजने दिले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनशी संबंधीत एका व्यक्तीने सांगितले की, सरकार आणि कारखानदार यांच्यातील साखर निर्यातीचा मुद्दा सोडविण्यात यश आले आहे. पहिल्या टप्प्यात ५,००,००० टन साखर निर्यात केली जाईल. यांदरम्यान, देशातील साखरेची किंमत वाढू दिली जाणार नाही. मात्र नव्याने स्टॉक आल्यानंतर याची किंमत वाढू शकते. चालू महिन्यात उसाचे गाळप सुरू होईल, असे या प्रतिनिधीने सांगितले. कारखानदार या आठवड्यात पंतप्रधानांची भेट घेतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.