अतिरिक्त साखर निर्यातीसाठी परवानगी देण्याची पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनची मागणी

लाहोर : सरकारने अतिरिक्त साखर निर्यातीची परवानगी दिली पाहिजे या आपल्या मागणीचा पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने (PSMA) पुनरुच्चार केला आहे. कारण अन्न सुरक्षा मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, पुढील वर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेचा जवळपास १७,३६,०१७ मेट्रिक टन साठा शिल्लक असेल. PSMAच्या वतीने आयोजित बैठकीत २०२१-२२ या हंगामात देशात ७८,०५,५६४ मेट्रिक टन साखर उत्पादन झाल्याचा दावा करण्यात आला. मंत्रालयाकडील आकडेवारीनुसर, गेल्या हंगामात ५१,७०६ मेट्रिक टन साखर साठा उपलब्ध होता. तर बिटपासून उत्पादित ७०,००० टन साखरही गेल्या हंगामाच्या सुरुवातीपर्यंत उपलब्ध होतील. म्हणजेच गेल्या हंगामाच्या अखेरीस एकूण ८०,२७,२७० मेट्रिक टन साखर उपलब्ध होती.

मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार दिसून येते की, ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत किमान ५३,१६,४७३ मेट्रिक टन साखरेचा वापर करण्यात आला. देशातील साखरेचा दैनंदिन खप १५,८९० टन आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये आगामी गळती हंगामाच्या सुरुवातीला किमान १७,३६,०१७ मेट्रिक टन साखर उपलब्ध असेल. PSMA ने दावा केला की, जर अतिरिक्त साखर निर्यात केली, तर देशाला १ बिलियन डॉलर परकीय चलन मिळू शकते. पीएसएमएच्या बैठकीत सांगण्यात आले की, अलिकडेच झालेल्या पावसाने ऊस उत्पादनात वाढ होवू शकते. आणि पुढील हंगामात अतिरिक्त साखरेचे उत्पादन असेल. गेल्या ७-८ महिन्यांपासून साखर उद्योग अतिरिक्त साखर निर्यातीची मागणी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here