पाकिस्तानात रमजानमध्ये सवलतीच्या दराने साखर

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

लाहोर (पाकिस्तान) : पाकिस्तानात साखरेचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे येत्या रमजानच्या महिन्यात सरकार सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात साखर उपलब्ध करून देईल, अशी माहिती पाकिस्तानचे उद्योग आणि व्यापारमंत्री मईन अस्लम इक्बाल यांनी दिली.

पाकिस्तानच्या शुगर मिल असोसिएशनने मंत्री इक्बाल यांची भेट घेतली. त्यावेळी ऊस उत्पादकांची थकीत बिले, रमझान पॅकेज आणि बाजारपेठेतील उपलब्ध साखर या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सचिव पातळीवरील अधिकारी देखील उपस्थित होते.

मईन इक्बाल म्हणाले, साखरेच्या वितरक आणि माफियांना कोणत्याही परिस्थितीत साठेबाजी करू देणार नाही. येत्या रमझानच्या महिन्यात सवलतीच्यादराने साखर देण्यास साखर उद्योगातील सगळ्यांनीच मंजुरी दिली. साखर कारखानदारांनी यावेळी उद्योगापुढील काही अडचणीही मांडल्या. मंत्री इक्बाल यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे भागवण्यासाठी योग्य नियोजन करून त्याची अंमलबजवाणी करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here